प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय जनता पार्टीच्या वणी शहराच्या वतीने गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून शहरातील गुरुवर्य व्यक्तींचा आदर सन्मान व सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मनुष्य जीवनात गुरुचे स्थान हे महत्वाचे असते. गुरूंच्या आदर सन्मानाची ही परंपरा जोपासत गुरू पौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी शहरातील गुरुवर्य व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्या घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित वणी शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांच्या पुढाकारातून गुरुवर्य व्यक्तींच्या आदर सत्काराचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनांचे पालन करून भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शहर भाजपच्या वतीने शहरातील आदरातिथ्य व्यक्तिमत्त्व असलेल्या संस्कृत पंडित प्रा. स्वानंद पुंड, जैताई मंदिराचे सर्वेसर्वा माधव सरपटवार, प्रसिद्ध कीर्तनकार मुन्ना महाराज तुंगनायत, योग शिक्षक महादेवराव खाडे यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत गुरु पूजा करण्यात आली. तसेच प्रसिद्ध तबला वादक दिवंगत कुचनकार यांच्या घरी जाऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
गुरुवर्यांचा आदर सत्कार हा अभिनव उपक्रम राबवितांना भाजप शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी मानवतेचं दर्शन घडविलं. गुरूंना आदराचं स्थान देण्याची आपली संस्कृती जोपासत त्यांनी गुरू चरणी माथा टेकला. त्यांचा आदर सत्कार केला. या प्रसंगी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगर सेवक संतोष डंभारे, साखरकर गुरुजी, बालाजी भेदोडकर, हितेन अटारा, मयूर गोयंका आदी भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments: