प्रशांत चंदनखेडे वणी
वणी वरून नागपूरला जाणाऱ्या धनश्री ट्रॅव्हल्सचा वणी वरोरा मार्गावरील लो. टि. महाविद्यालयाजवळ अपघात झाला. ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले, व ट्रॅव्हल्स थेट डिव्हायडला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. त्याला घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात हलविले. ट्रॅव्हल्स मधील प्रवासी मात्र सुखरूप आहेत.
वणी वरून प्रवासी घेऊन नागरपूरच्या प्रवासाला निघालेल्या धनश्री ट्रॅव्हल्सचा (MH ४० AT ०५६५) १६ जुलैला सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील लो.टि. महाविद्यालयाजवळ अपघात झाला. मोपेड दुचाकीला (MH २९ CA ४३७) धडक देत ही ट्रॅव्हल्स थेट डिव्हायडरवर चढली. या अपघातात सुदैवाने ट्रॅव्हल्स मधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. मात्र दुचाकी चालक कवडू गेडाम (५५) रा. भीमनगर हा या अपघातात जखमी झाला आहे. त्याला घटनास्थळी जमलेल्या लोकांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दुचाकी चालक हा मेकॅनिक मिस्त्री असल्याचे कळते. दुचाकीला धडक दिल्यानंतर ट्रॅव्हल्स चालकाचे ट्रॅव्हल्स वरील नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स थेट डिव्हायडरला धडकली.
No comments: