Latest News

Latest News
Loading...

मोटारसायकल अपघातात गणेश कॉम्प्युटरचे संचालक गणेश रांगणकर गंभीर जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी 

मोटारसायकलला झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना १५ जुलैला रात्री ८.३० ते ८.४५ वाजताच्या सुमारास वणी चारगाव चौकी मार्गावरील मंदर फाट्यावर घडली. रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटारसायकल धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी युवकावर नागपूर येथे उपचार सुरु आहे.

सर्व प्रकारची ऑनलाईन कामे होत असलेल्या शहरातील प्रसिद्ध गणेश कॉम्प्युटरचे संचालक तथा पत्रकार गणेश रांगणकर हे वणी चारगाव चौकी मार्गाने मोटारसायकलने वणीकडे येत असतांना मंदर फाट्यावर त्यांच्या दुचाकीला भिषण अपघात झाला. उभ्या ट्रकला मागून दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात गणेश रांगणकर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना आधी वणी ग्रामीण रुग्णालय नंतर एका खाजगी रुग्णालयात आणि नंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. नागपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्य मार्गावर रात्री बेजबाबदारपणे ट्रक उभे केले जात असून प्रमुख वाहतुकीच्या रस्त्यांवर तासंतास उभ्या असणाऱ्या ट्रकांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर बेजबाबदारपणे उभे करण्यात येणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

No comments:

Powered by Blogger.