प्रशांत चंदनखेडे वणी
भारतीय जनता पार्टीच्या शहर व तालुका स्तरावरील विविध महत्वांच्या पदांवर कार्यकुशल व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता तालुक्यात पक्ष संगठन मजबूत करण्याकरिता वरिष्ठ स्तरावरून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशावरून व स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन तालुक्यातील मोठ्या व महत्वाच्या पदांवर पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या व्यक्तींना नियुक्त्या देण्यात येत आहे. भाजपमध्ये सध्या पद नियुक्ती व पद बढती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील विविध शाखांची पुर्नबांधणी व पद नियुक्तीवर भर देण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वणी (ग्रामीण) तालुकाध्यक्ष पदावर संतोष गोवारदिपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष गोवारदिपे हे तरोडा ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: