प्रशांत चंदनखेडे वणी
वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणी, मारेगाव, झरी तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलैला त्रिमूर्ती मंगल कार्यालय मार्डी येथे हा ६७५ वा समाधी सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
सोमवार २१ जुलैला रात्री ८ वाजता घटस्थापना व महिलांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. २२ जुलैला सकाळी ९ वाजता पासून मुख्य कार्यक्रमाला सुरवात होईल. सकाळी ९ वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच भजनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जुमळे (अध्यक्ष आयोजन समिती, मार्डी) हे राहणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणीचे सचिव सुरेश किटे यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयोजन समितीचे सचिव अभय जुमळे, कोषाध्यक्ष अनंता जुमळे हे उपस्थित राहणार आहेत.
शिंपी समाजकार्यात नेहमी तत्पर असलेल्या सुरेश किटे, श्रीकांत बहादे, अशोक ढाले, सुधाकर ढाले, कुंतलेश्वर तुडविले, अरुण वाढई, मारोती देवगीरकर यांच्या पुढाकारातून या ठिकाणी हा समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यातच दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत दहंडीचा कार्यक्रम होणार आहे. तर दुपारी २.३० वाजता पासून महाप्रसादाला सुरवात होईल. समाधी सोहळ्यातील या सर्व कार्याक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोरेश्वर उज्वलकर, उपाध्यक्ष कुंतलेश्वर तुरविले, सचिव सुरेश किटे, सहसचिव श्रीकांत बहादे, कोषाध्यक्ष प्रभाकर उज्वलकर यांनी केले आहे.
No comments: