प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायतीचे सरपंच तथा वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत गौरकार यांची भारतीय जनता पार्टीच्या वणी तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. भाजप कडून पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता महत्वाच्या पदांवर निष्ठावान व कार्यतत्पर व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता भाजपने पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. तडफदार कार्यकर्त्यांना पक्षात बढती देण्यात येत असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करण्याऱ्या व्यक्तींना पक्षात सामावून घेतले जात आहे. हेमंत गौरकार यांची राजकीय कारकीर्द प्रभावशाली राहिली असून समाजकार्यातही ते सदैव सक्रिय राहिले आहेत. राजकारण व समाजकारणात आपल्या विशेष कार्यशैलीने स्वतःला सिद्ध करणाऱ्या हेमंत गौरकार यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वणी तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. महत्वाच्या पदावर योग्य व्यक्तीची निवड झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: