प्रशांत चंदनखेडे वणी
गाडेघाट गावात अजूनही एसटी महामंडळाची बस पोहचली नाही. अडेगाव मार्गे येडत गावापर्यंत वणी आगाराची बससेवा सुरु आहे. मात्र येडत गावापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या गाडेघाट गावाला अद्याप बससेवेचा लाभ मिळालेला नाही. गावकरी अजूनही बससेवेपासून वंचित आहेत. बस अभावी विद्यार्थी व गावकऱ्यांना प्रवासात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे गाडेघाट गावात बससेवा सुरु करण्याची मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने वणी आगार व्यवस्थापकांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
गाडेघाट गावात एसटी महामंडळाची बससेवा सुरु नसल्याने विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येडत गावापर्यंत बस येते. पण तेथून २ किमी अंतरावर असलेल्या गाडेघाट गावात अजूनही एसटी महामंडळाची बस पोहचली नाही. त्यामुळे येथील नागरिक बससेवेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना बस पकडण्याकरिता खाजगी वाहनांनी येडत या गावापर्यंत जावं लागतं. त्यात त्यांचा अधिकचा पैसा व वेळ दोन्ही खर्च होत आहे. गावात बस सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे गाडेघाट गावात बससेवा सुरु करण्याची आग्रही मागणी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने वणी आगार व्यवस्थापक यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा संघटक गणपत लेडांगे, तालुकाध्यक्ष संतोष कुचनकर, प्रकाश कऱ्हाड, मंगेश पाचभाई, कुंदन टोंगे, अजय कवरासे, कुलदीप वासाडे, आनंद घोटेकर आदी उपस्थित होते. गाडेघाट गावात लवकरात लवकर बससेवा सुरु व्हावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांमधूनही व्यक्त करण्यात येत आहे.
No comments: