प्रशांत चंदनखेडे वणी
सुस्वभावी, मनमिळाऊ व सुपरिचित व्यक्तिमत्व असलेले दत्तात्रेय बापूराव सुरावार यांचं अल्पशा आजारानं उपचारादरम्यान निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ८२ वर्षांचं होतं. शहरातील एसपीएम हायस्कुलचे ते माजी मुख्याध्यापक होते. त्यांच्या हातून कित्येक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. ९ जुलैला मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. दत्तात्रेय सुरावार हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनिष सुरावार यांचे वडील होते. त्यांच्या निधनाने सुरावार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्च्यात तीन मुलं, सुना, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशीच विद्यार्थी घडविणारा गुरु सर्वांना सोडून निघून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार १० जुलैला स्टेट बँक जवळील त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments: