Latest News

Latest News
Loading...

निळापूर झुडपी जंगलात परत वाघाची दहशत, दोन पाळीव जनावरांवर केला वाघाने हल्ला, वाघांचा बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी तालुक्यातील निळापूर गावातील पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परत एकदा गावकऱ्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडल्याने निळापूर गावालगत असलेल्या झुडपी जंगलात वाघांचा वावर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे वाघापासून मानवी जीवांना धोका निर्माण होण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी तालुक्याच्या वतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्याचेही निवेदनात म्हटले आहे. 

निळापूर गावातील सूर्यभान चटप व वासुदेव ठाकरे या दोन शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याने गावकऱ्यांमध्ये परत एकदा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी निळापूर गाव शिवारात वाघाने धुमाकूळ घातला होता. जनावरांबरोबरच वाघाने मनुष्यांवरही हल्ले केले होते. त्यामुळे गाववासी प्रचंड दहशतीत आले होते. त्या नरभक्षी वाघाला नंतर वन विभागाने जेरबंद केले होते. परंतु आता परत वाघांनी निळापूर गावाजवळील झुडपी जंगलाकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. गावातील दोन पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर निळापूर व आसपासच्या गावात परत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

पाळीव जनावरांवर वाघाने हल्ला केल्याने शेतकरी वर्ग कमालीचा धास्तीत आला आहे. तसेच शेतकरी व गावकऱ्यांना आपल्या पाळीव जनावरांविषयी चिंता निर्माण झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकरी व शेत मजुरांचे सतत शेतात जाणे येणे सुरु असते. शेतात राबणाऱ्या शेतकरी व शेत मजुरांना वाघापासून धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले होऊ लागल्याने शेतकरी संकटात येण्याची भीती निर्माण झाल्याने वाघांचा ताबडतोब बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व शेत मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक त्या उपाययोजना करणेही जरुरीचे झाले आहे. 

नैसर्गिक आपत्तीने आधीच शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच हिंस्र प्राण्यांकडून शेतीचा आधार असलेल्या जनावरांवर हल्ले होऊ लागल्याने शेतकरी प्रचंड काळजीत आला आहे. त्यामुळे गावालगत असलेल्या झुडपी जंगलात संचार करणाऱ्या वाघांचा त्वरित बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी मनसे वणी तालुक्याच्या वतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांच्या मालकांना शीघ्र आर्थिक मदत देण्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतांना मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. 

No comments:

Powered by Blogger.