Latest News

Latest News
Loading...

शिवसेनेच्या (उबाठा) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न, शिवसैनिकांवर सोपविण्यात आला विभागनिहाय पदभार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता आमदार संजय देरकर यांचा पक्ष बांधणी व पद नियुक्ती करण्यावर भर दिसून येत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाची (उबाठा) कमान सांभाळल्यानंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम केलं. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांनी एकजूट केली. गावागावात त्यांनी शिवसेनेच्या शाखा तयार केल्या. पक्ष प्रवेश सोहळे घेतले. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेशी जुळले. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसैनिकांची एक मजबूत फळी तयार झाली आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रातील त्यांची कार्यतत्परता पाहून जनतेनेही त्यांच्यावर विश्वास दाखविला. आणि वणी मतदार संघातून त्यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या विजयाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य जागलं आहे. शिवसनिकांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आणखी जोमात पक्षाचं कार्य करावं या उद्देशाने शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या शिवसैनिकांना आता महत्वाची पदे बहाल करण्यात आली आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विभागनिहाय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. 

वणी विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ व आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शिवसेना पक्षाशी (उबाठा) एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावान शिवसैनिकांना संघटनेतील विविध पदे बहाल करण्यात आली आहेत. त्यांच्यावर विभागनिहाय निवडणूक नियोजन आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या निष्ठावान शिवसैनिकांच्या नेतृत्वाखालीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा झेंडा फडकावयाचाच असा ठाम निर्धार निवडणूक नियोजनाचा पदभार सोपविण्यात आलेल्या या शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

वणी मतदार संघात आमदार संजय देरकर यांची संघटनात्मक बांधणी भक्कम असून त्याचेच फलित म्हणून त्यांचा विधानसभा निवडणुकीत विजय साकार झाला. निवडून आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तळमळीने नागरिकांची कामे केली. मतदार संघातील समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले. एवढेच नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्यांनी वणी मतदार संघातील समस्या प्रभावीपणे मांडल्या. आमदार देरकर हे नागरिकांचे प्रश्न आजही तेवढ्याच गांभीर्याने घेतात. ते सोडविण्याकरिता तेवढीच तत्परता दाखवितात. 

लोकांमध्ये मिसळून काम करणारा नेता म्हणून त्यांची स्थानिक पातळीवर ओळख आहे. आमदार असतांनाही ते लोकांसोबत जमिनीवर राहून कामे करतात. नागरिकांच्या समस्या ते प्रत्यक्षपणे समजून घेतात व त्यावर उपाययोजना करतात. जनतेशी जुळून त्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचं गाव पातळीवर संघटन मजबूत असून जनसंपर्क तगडा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा त्यांना नक्कीच लाभ मिळणार असल्याचे सूतोवाच केले जात आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी रणनीतीही आखायला सुरवात केली आहे. 

इतर पक्षांमध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरु असतांना आमदार देरकर यांनी शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर अन्याय होणार नाही याची सर्वस्वी काळजी घेतली. सर्वांना पक्षात न्याय दिला. सर्व पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना पदांचे वाटप करून त्यांनी सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. आमदार देरकर यांची ग्रामीण पातळीवर असलेली मजबूत पकड व तगडा जनसंपर्क बघता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा प्रभाव नक्कीच जाणवणार असल्याचा विश्वास वर्तविला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा विभागनिहाय पदभार सोपविण्यात आलेल्या शिवसैनिकांची नावे याप्रमाणे आहेत, अरविंद राजुरकर उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद घोन्सा वाघदरा, जयंत ताजने सर्कल प्रमुख जिल्हा परिषद घोन्सा वाघदरा, सुभाष कुंभरे सह संपर्कप्रमुख जिल्हा परिषद घोन्सा वाघदरा, दिवाकर उरकुडे विभाग प्रमुख पंचायत समिती घोन्सा, पांडुरंग चौधरी उपविभाग प्रमुख पंचायत समिती घोन्सा,  प्रवीण शेरकी संघटक पंचायत समिती घोन्सा, सचिन कुसळकर विभाग प्रमुख पंचायत समिती वागदरा, पुंडलिक माथनकर संघटक पंचायत समिती वागदरा, पंढरी राजूरकर उपतालुकाप्रमुख जिल्हा परिषद राजुर चिखलगाव, प्रमोद मिलमिले सर्कल प्रमुख जिल्हा परिषद राजुर चिखलगाव, सुनील ढूमने विभाग प्रमुख पंचायत समिती चिखलगाव, संदीप भोयर उपविभाग प्रमुख पंचायत समिती चिखलगाव, जीवन बेलेकर संघटक पंचायत समिती चिखलगाव, सतीश तेडेवार विभाग प्रमुख पंचायत समिती राजुर, संजय गोबाडे उपविभाग प्रमुख पंचायत समिती राजुर, पवन असेकर संघटक पंचायत समिती राजुर, मनोज डेंगळे उपतालुका प्रमुख जिल्हा परिषद लाठी लालगुडा, विजय राजूरकर सर्कल प्रमुख जिल्हा परिषद लाठी लालगुडा, आणाजी काकडे सहसंपर्क प्रमुख जिल्हा परिषद लालागुडा, अनिल राजगडकर विभाग प्रमुख पंचायत समिती लाठी, योगेश उपरे उपविभाग प्रमुख पंचायत समिती लाठी, महेश ठोंबरे संघटक पंचायत समिती लाठी, सुभाष झाडे विभाग प्रमुख पंचायत समिती लालगुडा, राजेंद्र ढोबे उपविभाग प्रमुख पंचायत समिती लालगुडा, गंगाधर परचाके संघटक पंचायत समिती लालगुडा, लूकेश्वर बोबडे उप तालुकाप्रमुख शिंदोला तरोडा जिल्हा परिषद, संदीप थेरे विभाग प्रमुख पंचायत समिती तरोडा, हनुमान पायघन सर्कल प्रमुख तरोडा, विजय काकडे उपविभाग प्रमुख तरोडा, दिवाकर भोंगळे संघटक संपर्कप्रमुख, प्रमोद हनुमंते सर्कल प्रमुख, प्रवीण पिंपळकर व विजय ताजने उपविभाग प्रमुख, अनिल पिंपळकर संघटक सर्कल प्रमुख सर्व तरोडा जिल्हा परिषद, उपतालुका प्रमुख विजय ठाकरे कायर शिरपूर जिल्हा परिषद, विभाग प्रमुख दिवाकर कवरासे, दिवाकर कोल्हेकर संपर्कप्रमुख कायर शिरपूर जिल्हा परिषद, संतोष धांडे उपविभाग प्रमुख कायर शिरपूर जिल्हा परिषद, पुंडलिक पिंपळशेंडे संघटक सर्कल प्रमुख कायर शिरपूर जिल्हा परिषद, सर्कल प्रमुख पंचायत समिती शिरपूर तुळशीराम बोबडे, उपविभाग प्रमुख आनंद उरकुडे, पंचायत समिती शिरपूर संघटक सर्कल प्रमुख गजानन टोंगे.

No comments:

Powered by Blogger.