प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील खडबडा मोहल्ला येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. १२ ऑगस्टला सकाळी उघडकीस आली. अमोल पुंडलिकराव वरभे (४०) रा. तळेगाव जि. वर्धा ह.मु. खडबडा मोहल्ला असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
खडबडा मोहल्ला येथे अवघ्या काही दिवसांपूर्वीच किरायाच्या घरात राहण्याकरिता आलेला हा युवक गवंडी काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा. घटनेच्या दिवशी तो घरी एकटाच होता. त्याची एक पत्नी त्याच्या सोबत राहत नव्हती. तर दुसरी पत्नी राखी बांधण्याकरिता बाहेरगावी गेली असल्याचे सांगण्यात येते. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने घराच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: