Latest News

Latest News
Loading...

मोटारसायकल ट्रकच्या मागून धडकल्याने गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळ उभ्या ट्रकला मागून दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा चंद्रपूर येथे रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला. ही घटना ९ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. नारायण दौलत मुंगुले (५५) रा. हटवांजरी ता. मारेगाव असे या अपघातात दुर्दवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग त्रीभुवन सपाट (रा. हटवांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे मामा नारायन दौलत मुंगुले (वय ५५, रा. हटवांजरी) हे ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता मारेगाव येथून फवारणीसाठी औषध घेऊन मोटारसायकलने (क्र. MH 29 AC 4215) हटवांजरी या आपल्या गावाकडे जात होते.

दरम्यान कृषी महाविद्यालयासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर (MH 26 AD 0299) त्यांची दुचाकी आदळली. ट्रक चालकाने वाहनावर रिफ्लेक्टर, इंडिकेटर, साईड लाइट किंवा कोणतेही इशारा चिन्ह न लावल्यामुळे, नारायन मुंगुले यांची मोटारसायकल ट्रकच्या मागून जोरात धडकली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्याने व प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना परत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन उभे केल्याबाबत मारेगाव पोलिसांनी मोटार अधिनियम १९८८ च्या कलम १२२, १७७ व बीएनएसच्या कलम १०६(१) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


No comments:

Powered by Blogger.