श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडोंचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश, डॉ. नीरज वाघमारे यांचा मारेगाव तालुक्यात झंझावाती संवाद दौरा
प्रशांत चंदनखेडे वणी/मारेगाव :-
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी सुरु केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मारेगाव तालुक्यातील झंझावाती दौऱ्यादरम्यान शेकडो नागरिकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. गावोगावी झालेल्या भरगच्च सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सभांमध्ये बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, "प्रस्थापित आणि मनुवादी पक्षांनी बहुजन चळवळीचे तुकडे करून फुले-शाहू-आंबेडकरी शक्तीचे खच्चीकरण केले आहे. अशा परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच वंचितांना सत्तेकडे नेणारा खरा मार्ग आहे. बेचाळीस लाख मतांचा टप्पा पार करणारा हा एकमेव पक्ष असून, त्यावर विश्वास ठेवला तर वंचितांना सत्तेत भागीदारी नक्की मिळेल."
डॉ. वाघमारे यांच्या प्रभावी भाषणाने प्रेरित होऊन मारेगाव, आकापूर, लाखापूर, चिंचमंडळ, मार्डी, देवाळा, सिंदी, बोटोणी, नवरगाव, सगणापूर, सराटी, सालेभट्टी, कोलगाव आदी गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. यामध्ये समाजातील विविध घटक, महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, समिती पदाधिकारी आदींचा समावेश होता.प्रमुख पक्षप्रवेशींमध्ये मारेगावचे ज्ञानेश्वर मुन, सेख सलीम शेख रऊफ, निळावती मुन, आकापूरचे संजय वानखेडे (सामाजिक कार्यकर्ता), सौ. काटकर (उपसरपंच), लाखापूरचे प्रदीप पेंन्दोर (आदिवासी समाज नेते), चिंचमंडळचे ज्ञानेश्वर देठे, मार्डीतील यशोधरा लीहीतकर, देवाळ्याचे करमनकर, सिंदीचे मनोज भगत, बोटोणीचे उमाकांत बारसाकडे, नवरगावचे गयबिदासजी फुलझेले, सगणापूरचे सुनील वाघमारे, सराटीचे सिद्धार्थ बहादे, सालेभट्टीचे लीलाधर कोरझरे आणि कोलगावच्या सरपंच अभिषा निमसटकर यांचा विशेष समावेश आहे.
मारेगाव येथील साई मंदिरात गजानन चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली साई सेवा समितीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनीही वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
या संवाद दौऱ्यात जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, वणी विधानसभा प्रमुख राजेंद्र निमसटकर, तालुकाध्यक्ष गौतम दारुंडे, तालुका उपाध्यक्ष संजय जीवने यांसह वणी-मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. दिवसभर झालेल्या या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेवर जनतेचा विश्वास दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
No comments: