Latest News

Latest News
Loading...

वीज कोसळून मृत्यू – आमदार संजय देरकर यांच्या पाठपुराव्याने वारसांना मिळाली शासकीय मदत

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा मतदार संघातील पिसगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा पांढरकवडा येथील रहिवासी अनिल रमेश फडताळे यांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. या नैसर्गिक आपत्तीने घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अचानक ओढवलेल्या या संकटामुळे कुटुंब मानसिक व आर्थिक अडचणीत सापडले होते.

या वेळी आमदार संजय देरकर यांनी पुढाकार घेत प्रशासनाकडून पंचनामा करून घेतला व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कुटुंबाला ४ लाख इतकी शासकीय मदत मिळवून दिली. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी फडताळे यांच्या घरी जाऊन त्यांनी शासकीय मदतीचा हा धनादेश त्यांच्या कुटुंबियांच्या सुपूर्द केला. 

या वेळी मारेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनीष मस्की, तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुट्टे, शहर प्रमुख अभय चौधरी, करण किंगरे यांच्यासह शिवसेनेचे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच तहसीलदार उत्तम निलावाड, बीडीओ भीमराव वानखेडे यांच्यासह ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित झाले.


आमदार संजय देरकर यांनी याप्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की,

“माझ्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या संकटाच्या काळात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकाला मिळावा, यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन.”

या कार्यामुळे कर्तव्यनिष्ठ आणि जनतेशी नाळ जोडून ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार संजय देरकर यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची आणि जनहिताच्या कार्याची प्रचिती दिली आहे.

No comments:

Powered by Blogger.