Latest News

Latest News
Loading...

अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा — १६३४ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील वणी, मारेगाव, मुकुटबन, शिरपूर व पाटण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कार्यरत विविध शाळांमध्ये "अंमली पदार्थाचे दुष्परिणाम" या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या उपक्रमात तब्बल १६३४ विद्यार्थी सहभागी झाले.

यामध्ये वणी पोलीस स्टेशन हद्दीतील ११२०, मारेगाव २००, मुकुटबन १००, शिरपूर १३४ आणि पाटण येथील ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश यशस्वी ठरला.

बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्व पराग बरडकर (इयत्ता ९ वी, स्वर्णलीला स्कूल, वणी), द्वितीय क्रमांक मानसी गणेश थेरे (इयत्ता १० वी, राष्ट्रीय विद्यालय, मारेगाव) तर तृतीय क्रमांक तेजस्विनी प्रमोद बोडे (इयत्ता १२ वी, लोकमान्य टिळक महाविद्यालय) व सुचिता सूर्यभान परचाके (श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरपूर) या स्पर्धकांचा आला.

समारंभाला उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, ठाणेदार गोपाल उंबरकर, माधव शिंदे (ठाणेदार, शिरपूर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागातील सर्व ठाणेदार, तसेच पोहेका/ प्रदिप ठाकरे, विजय वानखडे, इक्बाल शेख, रुपाली डाहुले, अमोल नुन्नलेवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांविषयी जागरूकता वाढविण्याबरोबरच, सामाजिक बांधिलकीची जाणीवही दृढ झाली.


No comments:

Powered by Blogger.