प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील प्रसिद्ध श्री लक्ष्मीनारायण सहकारी पतसंस्था, वणी येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिना निमित्त पतसंस्थेत घेण्यात आलेला ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी जय जगन्नाथ मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी वणीचे अध्यक्ष संजय खाडे, पतसंस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, अभिकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीच्या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव साजरा केला. 💐
No comments: