Latest News

Latest News
Loading...

सूशगंगा पब्लिक स्कूल वणीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश

 

प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्हा क्रीडा विभाग व वेटलिफ्टिंग असोसिएशनतर्फे यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सूशगंगा पब्लिक स्कूल, वणीच्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद आणि कौशल्य दाखवत यशाची चमक दाखवली.

या स्पर्धेत तब्बल १६ तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी राठोड गुरुजी होते. तर वेटलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव ताराचंद चव्हाण व कराडे गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सूशगंगा पब्लिक स्कूलच्या तब्बल ३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहापूर्ण सहभाग घेतला. त्यापैकी १९ वर्षाखालील गटात चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी होऊन विभागीय स्तरावर स्थान पटकावले. त्यात हीर लोणारे, झेईनुद्दीन शेख, हसिब पठाण, चिराग पारखी या चार विद्यार्थ्यांची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे.

या यशामागे शारीरिक शिक्षण देणारे शाळेचे शिक्षक गौतम जीवने यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शाळेच्या प्राचार्या देबोश्री शहा, सूशगंगा ग्रुपचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार व संचालक मोहन बोनगीरवार यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे सूशगंगा पब्लिक स्कूल वणीचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल ठरले असून विद्यार्थ्यांच्या जिद्दीला व परिश्रमाला योग्य तो मान मिळाला आहे.


No comments:

Powered by Blogger.