प्रशांत चंदनखेडे वणी :-
भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत शहरात सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहेत. या काळात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने १७ सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील बाजोरिया हॉल येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांच्या पुढाकारातून हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत बाजोरिया हॉल येथे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांच्या विद्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.
लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील डॉक्टरांचं या शिबिराला सहकार्य लाभणार असून येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आजारग्रस्त व गंभीर आजारांची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांनी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. कुणाल चोरडिया यांनी केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ असल्याची खात्री करून घेण्यासाठी देखील आपल्या आरोग्याची तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सेवा पंधरवाडा अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिराबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही या काळात राबविण्यात येणार आहेत.
No comments: