Latest News

Latest News
Loading...

उसनवारीच्या पैशावरून दोन भावंडांची एकाला जबर मारहाण


प्रशांत चंदनखेडे वणी :-

उसनवारीच्या पैशावरून वाद घालून दोन भावंडांनी एका युवकाला जबर मारहाण केली. मारहाणीत युवक जखमी झाला असून त्याने झालेल्या मारहाणीबाबत पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी भावंडांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शहरातील रंगारीपुरा येथे १५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. 

शहरातील भोईपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या गणेश तुळशीराम नागपुरे याच्याशी रंगारीपुरा येथील अथर्व येरणे (३३) व यश येरणे (२२) या दोन भावंडांनी उसनवारीच्या पैशावरून वाद घालत त्याला जबर मारहाण केली. गणेश हा उसने दिलेले पैसे मागण्यासाठी आरोपींच्या घरी गेला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात त्याच्या तोंडाला मार लागून त्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे आरोपींच्या मारहाणीत जखमी झालेल्या गणेशने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली.

त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अथर्व येरणे व यश येरणे या दोन्ही आरोपी भावंडांवर बीएनएसच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२)(३), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.  


No comments:

Powered by Blogger.