प्रशांत चंदनखेडे वणी :-
नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून यंदा वणी नगरीत धार्मिक आणि आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर समिती तर्फे यावर्षी ५१ जागृत शक्तीपीठांपैकी हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून वणी येथे आणली जाणार आहे.
समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी ही पवित्र ज्योत वणी नगरीत आगमन करणार असून दुर्गा माता मंदिरात विधीपूर्वक तिची स्थापना केली जाणार आहे.
दरवर्षी एका शक्तीपीठातून अखंड ज्योत वणी येथे आणण्याची परंपरा सुरू असून, पहिल्या वर्षी माहूर येथील रेणुका माता, दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील तुळजाभवानी माता, आणि यावर्षी कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली माता यांच्या अखंड ज्योतीचे आगमन होणार आहे. ही अखंड ज्योत भाविकांसाठी ९ दिवस दर्शनार्थ ठेवण्यात येणार असून, विविध धार्मिक कार्यक्रमांनी यावर्षीचा हा नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ही पवित्र ज्योत वणी येथे आणण्यासाठी समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांच्यासह चंदन मोहुर्ले, अविनाश कामटकर, मारोती गोखरे यांचा सहभाग राहणार आहे.
भाविक भक्तांनी या दिव्य अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन आपले जीवन मंगलमय करावे, असे आवाहन मंदिर समितीतील रवि बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, अमोल बदखल, राजकुमार अमरवानी, विलास डवरे, सतिश कामटकर, नितीन मसेवार, धम्मा मनवर, अशोक मांदाडे, संजय लोणारे, विनोद मुथा, चंद्रकांत फेरवानी, राजु जयस्वाल, समिर लाभसेटवार, मनु महाराज तुगनायत, अशोकजी बतरा आदींनी केले आहे.
🙏 नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून भक्तिभावाने नटलेल्या वणी नगरीत श्रद्धेचा सोहळा अनुभवण्यास सज्ज व्हा.
No comments: