Latest News

Latest News
Loading...

वागदरा ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने मनसेत पक्ष प्रवेश : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्षाची मोर्चे बांधणी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांचं संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील वागदरा (जुना) गावातील महिला, पुरुष आणि तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

हा प्रवेश सोहळा मनसे नेते राजु उंबरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यांनी नवीन कार्यकर्त्यांचे गमछा घालून स्वागत केले आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण मतदारसंघांमध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी अशा प्रवेश सोहळ्यांना विशेष महत्त्व असल्याचे ते म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये या नव्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मनसे अधिक सक्षमपणे लढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रा. राम ठमके, रामदास निखाडे, शाखा अध्यक्ष शुभम हुलके, उपाध्यक्ष आकाश राजुरकर, सूरज पाचभाई, गौरव बरडे, धनंजय खनगण, प्रकाश वैद्य, आलोक खनगण, प्रफुल उपाध्ये, आशिष वाभिटकर, निलेश जाधव यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, व्यापारी सेना शहराध्यक्ष राकेश वैद्य, तसेच शंकर पिंपळकर, मयूर घाटोळे, लक्की सोमकुंवर, अमर पाचभाई, भोला चिकनकर, हिरा गोहोकार, अक्षय बोबडे यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. प्रस्तावना तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केली तर सूत्रसंचालन प्रा. राम ठमके यांनी केले.

👉 या प्रवेशामुळे मनसेने ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी आणि पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि ग्रामीण भागात निर्माण होत असलेली कार्यकर्त्यांची नवीन फळी, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे स्पर्धात्मक आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

No comments:

Powered by Blogger.