Latest News

Latest News
Loading...

सेवा पंधरवाडा अंतर्गत उद्या शहरात "नमो युवा रन..." नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन


प्रशांत चंदनखेडे वणी :-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता "सेवा पंधरवाडा" हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने वणी शहर भाजपच्या वतीने माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात तथा शहर अध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात शहरात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत असून १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात लोकहितार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजता "नमो युवा रन" नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या स्पर्धेला सुरवात होणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत "सेवा पंधरवाडा २०२५" साजरा करण्यात येत आहे. याच काळात दुग्धशर्करा असा योग्य जुळून येतो, तो म्हणजे वणी विधानसभेच्या दोन पंचवार्षिक निवडणूका गाजविणारे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा वाढदिवस. त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच २५ सप्टेंबरला "नमो युवा रन" नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. शहरात सेवा पंधरवाडा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येत असून शहर भाजपद्वारा ऍड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. 

याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही भव्य मॅरेथॉन स्पर्धा १६ वर्षावरील व १६ वर्षाआतील मुलामुलींसाठी स्वतंत्र गटात होणार असून या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. १६ वर्षाआतील मुलांच्या 'अ' गटाकरिता व मुलींच्या 'ब' गटाकरिता २.५ किमी अंतर राहणार असून या दोन्ही गटांसाठी प्रथम बक्षीस रोख ३ हजार आणि सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस २ हजार आणि सन्मान चिन्ह आणि तृतीय बक्षीस रोख १ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह याप्रमाणे राहणार आहे. तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या तीन स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत. 

त्याचप्रमाणे १६ वर्षावरील मुलांच्या 'क' गटाकरिता आणि मुलींच्या 'ड' गटाकरिता ३.५ किमी अंतर राहणार असून दोन्ही गटांसाठी प्रथम बक्षीस रोख ५ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय ३ हजार रुपये आणि सन्मान चिन्ह आणि तृतीय बक्षीस २ रोख दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह याप्रमाणे राहणार आहे. तसेच या गटातीलही तीन स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तेंव्हा नशामुक्त भारताचा संदेश देणाऱ्या या "नमो युवा रन" मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. 


No comments:

Powered by Blogger.