वणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील प्रसिद्ध नवशक्ती दुर्गामाता मंदिरात गुरुवारी (दि. २५ सप्टेंबर) महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार हे भेट देणार आहेत. वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा या दिवशी वाढदिवस असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळी ११.३० वाजता सुधिर मुनगंटीवार आणि संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गामाता मंदिर समितीचे अध्यक्ष रवि बेलुरकर यांनी केले आहे.
🔹 माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत आकर्षणाचे केंद्र
दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी या मंदिरात एका शक्तीपीठातून अखंड ज्योत आणण्याची परंपरा आहे. पहिल्या वर्षी माहूर येथील रेणुका माता, दुसऱ्या वर्षी तुळजापूर येथील तुळजाभवानी माता आणि यावर्षी घटस्थापनेच्या दिवशी (२२ सप्टेंबर) हरियाणा, कुरुक्षेत्र येथील माँ भद्रकाली मातेची अखंड ज्योत प्रज्वलित करून मंदिरात विधिपूर्वक प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सध्या ही पवित्र ज्योत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिरात ठेवण्यात आली असून, दररोज हजारो भक्तगण दर्शनाचा लाभ घेत आहेत. श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात सुरू झालेला नवरात्रोत्सव आता महाआरतीमुळे अधिकच मंगलमय होणार आहे. गुरुवारी होणारी महाआरती वणीकरांसाठी एक मोठा धार्मिक सोहळा ठरणार आहे.
No comments: