Latest News

Latest News
Loading...

चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या तरुणाला पोलिसांनी शिताफीने केली अटक

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरात रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवार दि. 16 सप्टेंबरला रात्री 12.30 वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर हे सहकाऱ्यांसह देशमुखवाडी परिसरात गस्त घालत असताना दुमोरे दवाखान्याजवळील बंद काशीनाथ मेडिकलच्या बाजूला एक तरुण अंधारात संशयास्पदरीत्या थांबलेला दिसून आला. पोलिसांना पाहताच त्या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव-पत्ता विचारला असता तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यानंतर पोलिसांनी त्याची पंचासमक्ष चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शेख समीर शेख साबीर पठाण (वय 20, रा. रंगनाथनगर, खरबडा मोहल्ला, वणी) असे सांगितले. पोलीस चौकशीत त्याने रात्री अंधारात थांबण्याचे कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. रात्री अंधाराचा आडोसा घेण्याचे कुठलेही ठोस कारण न सांगता तो पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करू लागला.

त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी पंचनामा करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा तरुण संपत्तीविषयक चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेला असल्याचे उघड झाले.

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणावर बीएनएसच्या कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


No comments:

Powered by Blogger.