Latest News

Latest News
Loading...

भाजपा व प्रहारच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश – आमदार संजय देरकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढला


प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील लाठी-लालगुडा सर्कल परिसरात शिवसेनेची मशाल तेजाने प्रज्वलित होतांना दिसत आहे. शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचा कल वाढू लागला आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपा व प्रहार पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना (उभाठा) पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वशैलीमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे युवक, नागरिक आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे या सोहळ्यातून पुन्हा अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला सहकार सेना उपजिल्हा संघटक संजय देठे व प्रफुल बदखल यांची विशेष उपस्थिती लाभली.

🔸 शिवसेनेत प्रवेश केलेले कार्यकर्ते:

भालर : गोविंदा आत्राम, शंकर जेऊरकर, शंकर पेंदाने, ग्रामपंचायत सदस्य किशोर लखमापूरे, प्रमोद देठे

बोरगाव (अहेरी) : सुमित कळसकर, तन्मय बल्की

लालगुडा : आबा बांगडे, कौसर अली सय्यद, विलास उमाटे, राजु कामटकर, सादिक पठाण, चंदू बोरपे, संजू घरकुडे.

🔸 आमदार संजय देरकर यांचे मार्गदर्शन:
“शिवसेना ही सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांची मशाल आहे. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि जनतेचा पाठिंबा हेच माझे बळ आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा माझा परिवार असून, सर्वांना न्याय आणि या क्षेत्राचा विकास हा माझा ध्यास आहे. आज पक्षप्रवेश केलेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो,” असे मनोगत आमदार संजय देरकर यांनी यावेळी केले.

या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर लाठी लालगुडा परिसरात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, जनतेचा कल शिवसेनेकडे झपाट्याने वळत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखालील वाढता जनाधार हा आगामी राजकारणात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा आता गावागावात रंगली आहे.

No comments:

Powered by Blogger.