प्रशांत चंदनखेडे वणी :-
मार्गात नादुरुस्त होऊन उभ्या असलेल्या ट्रकवर मागून दुसरा ट्रक आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. ही घटना रविवार दि. 28 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास वणी मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर घडली. अपघातातील सर्व जखमी हे राजूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांची नावे मात्र कळू शकली नाही.
वणी मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्यापासून काही अंतरावर एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत उभा होता. या ट्रकवर मागून मारेगाव कडून वणीकडे येणारा दुसरा ट्रक आदळला. या भीषण अपघातात ट्रकमध्ये बसून असलेले चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या दोघांच्याही पायांना जबर मार लागला आहे. या अपघातग्रस्त ट्रक मधील चारही जण राजूर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात ट्रक चालक मात्र सुखरूप बचावला आहे. त्याला कुठलीही इजा झालेली नाही.
निंबाळा गाववासीयांना अपघात झाल्याचे कळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनाही अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही अपघातस्थळी धाव घेतली. मार्गात नादुरुस्त होऊन उभा असलेला ट्रक रात्री त्या मार्गाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रक चालकाच्या दृष्टीस न पडल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.
No comments: