प्रशांत चंदनखेडे वणी :-
मारेगाव तालुक्यातील सर्वहारा, शोषित, आदिवासी, वंचित व बहुजन समाज संघटित करण्यासाठी तसेच वंचित बहुजन आघाडीला अधिक बळकटी देण्यासाठी १० सप्टेंबर रोजी बदकी भवन सभागृहात कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. वंचितचे राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या मेळाव्याला शेकडो जुन्या व नव्या दमाच्या उत्साही कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
या मेळाव्यात आपले परखड विचार मांडतांना वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर म्हणाले की, “जुलमी मनुवादी व्यवस्थेविरुद्ध लढायचे असेल तर श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. सर्वहारा व शोषितांच्या न्यायासाठी लढणारा एकमेव राजकीय पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. म्हणूनच ही संघटना अधिक बलशाली करणे ही आपली जबाबदारी आहे.”
यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे पदाधिकारी तसेच अमरनाथ तेलतुंबडे, तात्याजी चिकाटे, अजबराव गजभिये, यशवंतराव भरणे, गौतम ताकसांडे यांसारख्या जुन्या कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबरच महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येतील हजेरी हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य ठरले.
मेळाव्यादरम्यान लोकशाही पद्धतीने मारेगाव तालुका ग्रामीण व शहर कार्यकारिणी (पुरुष व महिला विभाग) गठीत करून पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. आगामी काळात नव्या कार्यकारिणीचा भव्य पदग्रहण व पक्षप्रवेश सोहळा घेण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम मालखेडे (बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले. तर ज्ञानेश्वर मून (नवनियुक्त मारेगाव तालुकाध्यक्ष, ग्रामीण) यांनी आभार मानले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी वासू वनकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
---
👉 नवनियुक्त कार्यकारिणी (संक्षिप्त):
🔹 मारेगाव ग्रामीण (पुरुष) – अध्यक्ष: ज्ञानेश्वर मून, कार्याध्यक्ष: गौतम दारुंडे, महासचिव: संजय जीवने
🔹 मारेगाव ग्रामीण (महिला) – अध्यक्ष: अभिषा निमसटकर, कार्याध्यक्ष: शोभा चंदनखेडे
🔹 मारेगाव शहर (महिला) – अध्यक्ष: रेखा काटकर, कार्याध्यक्ष: शोभा दारुंडे
🔹 मारेगाव शहर (पुरुष) – अध्यक्ष: अनंता खाडे, कार्याध्यक्ष: रवी तेलंग, महासचिव: विनेश मेश्राम
✍️ या मेळाव्यामुळे मारेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम झाल्याचे चित्र दिसून आले.
No comments: