Latest News

Latest News
Loading...

वणीतील १६ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता – आईने दाखल केली तक्रार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली असून, तिच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. मुलीला अज्ञात इसमाने फुसलवून पळवून नेल्याचा संशय देखील तक्रारीतून व्यक्त करण्यात आला आहे.

📌 घटनेची माहिती

तक्रारदार काजल (३७, रा. वणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी तिच्या धाकट्या बहिणीसोबत चॉकलेट आणण्यासाठी घराबाहेर पडली. काही वेळाने धाकटी बहीण घरी परतली मात्र थोरली बहीण घरी परतली नाही. आईने घरी परतलेल्या लहान मुलीकडे मोठ्या मुलीबाबत चौकशी केली असता तिने आईला सांगितले की, "ताई खर्रा घेण्यासाठी जाते," असे सांगून ती माझ्यापासून वेगळी झाली. तिने मला चॉकलेट घेण्यासाठी पैसे दिल्याने मी समोरच्या दुकानात गेली. त्यानंतर मी परत ताईने मला सोडले त्याठिकाणी आली असता मला ताई तेथे दिसली नाही, असे लहान मुलीने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेणे सुरु केले, मात्र तिचा काहीही मागमूस लागला नाही.

कुटुंबियांनी संपूर्ण वणी परिसरात व इतरही ठिकाणी मुलीचा शोध घेतला. नातेवाईक व मैत्रिणीकडेही चौकशी केली, मात्र कुठेही ती आढळून आली नाही. सुरुवातीला ती रागाच्या भरात घराबाहेर गेली असावी असा समज करून कुटुंबियांनी तिच्या परतण्याची वाट पाहिली. परंतु तीन दिवस लोटूनही ती घरी न आल्याने अखेर १० सप्टेंबर रोजी मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

📌 मुलीचे शारीरिक वर्णन

उंची : ४.५ फूट, रंग : निमगोरा, बांधा : सरळ-पातळ, केस : काळे व बॉयकट, विशेष लक्षणे : डोळ्यांना काजळ, उजव्या हातात काळा धागा व विक्रती अंगठी, उजव्या पायात चंदेरी धातूची बेडी व काळा धागा, अंगावरचे कपडे : काळा टी-शर्ट, काळी जिन्स, पोपटी रंगाचा काळा-पिवळा टिरक्या डिझाइनचा दुपट्टा

📌 पोलिसांकडून शोधकार्य सुरु 

या प्रकरणी वणी पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलीच्या बेपत्ताप्रकरणी गंभीर दृष्टीकोनातून चौकशी सुरू असून, मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा यासाठी पोलिसांनी तपासचक्र तीव्र केले आहे. पोलिस मुलीचा शोध घेण्यासाठी हरसंभव प्रयत्न करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.