प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील सुसाट वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्याची मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असून, काही दुचाकीस्वार व ऑटोचालक सुसाट वेगाने वाहने हाकत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रमुख चौकांमध्ये तातडीने गतिरोधक बसविण्याची आवश्यकता असल्याचे मानवी हक्क सुरक्षा परिषेदेद्वारा देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, जिल्हा महिला संपर्कप्रमुख सुमित्रा गोडे, जिल्हा महिला उपाध्यक्षा मनिषा निब्रड, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, शहर महिला अध्यक्ष प्रेमीला चौधरी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बन्सोड, तसेच संजय चिंचोळकर, संदीप बेसरकर, राकेश दिकुंडवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
👉 नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, नगर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
No comments: