प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी शहरात नवरात्रोत्सवानिमित्त भव्य गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचा शुभारंभ उद्या, दिनांक २२ सप्टेंबर रोजी होत असून, राम शेवाळकर परिसरात सांस्कृतिक जल्लोषाला प्रारंभ होणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले टप्पू सेनेचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाची आणि मनोरंजनाची जोड मिळणार आहे.
स्पर्धकांसाठी मौल्यवान बक्षिसे
स्पर्धकांसाठी वयोगटानुसार आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
११ ते ३० वर्षे वयोगटासाठी दुचाकी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, टॅब, मोबाईल, सायकल, होम थिएटर आणि पैठणी साडी अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
३१ वर्षांवरील गटासाठी सोन्याची नथ, ओव्हन, व्हॅक्यूम क्लिनर, पैठणी साडी आणि ज्युसर अशी बक्षिसे आहेत.
५ ते १० वर्षे वयोगटातील बालस्पर्धकांसाठी सायकलसह विविध आकर्षक गिफ्ट्सची सोय करण्यात आली आहे.
आतापर्यंत सुमारे १,००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. दररोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत स्पर्धा रंगणार आहेत.
महोत्सवासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची तयारी
महोत्सव यशस्वी करण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, गरबा महोत्सव समिती अध्यक्ष साहिल सलाट यांच्यासह वैभव पुराणकर, जतीन राऊत, लक्की सोमकुंवर, संस्कार तेलतुंबडे, गौरव पुराणकर, तालिब खान, योगेश तुराणकर, आशिष घनकसार, सतिश ठोंबरे, सचिन कुडमेते, कृष्णा कुकडेजा आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.
या उपक्रमामुळे वणी शहरातील नवरात्रोत्सवाला नवीन सांस्कृतिक ओळख मिळणार असून, नागरिकांमध्ये एकोपा आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
No comments: