Latest News

Latest News
Loading...

शहरातील पाणीटंचाईची आमदार संजय देरकर यांनी घेतली तातडीने दखल – नियमित पाणी पुरवठा करण्याचे दिले कठोर निर्देश


 प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरात मागील काही दिवसांपासून गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, चांगला पाऊस पडूनही अनेक भागांतील नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार संजय देरकर यांनी शनिवारी (दि. 20 सप्टेंबर) सकाळी रांगणा परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.

पाहणीदरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी थेट आमदारांपुढे मांडल्या. त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत आमदार देरकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश दिले.

👉 येत्या ८ दिवसांत वर्धा नदीवरून वणी शहराला पाणीपुरवठा सुरू करावा.

👉 नागरिकांना दररोज ठराविक वेळेत नियमित व पुरेसं पाणी मिळेल याची काटेकोर खबरदारी घ्यावी.

👉 पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळाची नेमणूक करावी.

आमदार संजय देरकर यांच्या या हस्तक्षेपामुळे वणीकरांना मोठा दिलासा मिळाला असून, पाणीटंचाईच्या समस्येवर त्वरित उपाययोजना होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Powered by Blogger.