Latest News

Latest News
Loading...

मारेगावात वंचितचा ‘महाआक्रोश मोर्चा’ – पावसातही उसळला वंचितांचा महासागर


 प्रशांत चंदनखेडे वणी :-

मारेगाव तालुक्यात २५ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी (VBA) तर्फे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यकर्ता मेळावा आणि ‘महाआक्रोश मोर्चा’ विक्रमी उपस्थितीमुळे ऐतिहासिक ठरला. सतत कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून “हा केवळ आक्रोश नसून निष्ठा आणि संघर्षाची साक्ष आहे” असा ठाम संदेश दिला.

मोर्च्याचे नेतृत्व VBA जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, शिवदास कांबळे, करुणा मून, मिलिंद पाटील आदींनी केले. महिलांचा व युवकांचा लक्षणीय सहभाग या आंदोलनाचे वैशिष्ट्य ठरले.

हजारोंच्या उपस्थितीत तहसील कार्यालयावर वंचितांचा हा मोर्चा धडकला. यावेळी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून वंचित बहुजन आघाडीकडून रास्त मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये महाबोधी महाविहार तात्काळ बौद्धांच्या ताब्यात द्यावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अतिवृष्टीमुळे ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

या मोर्चात उपस्थितांना संबोधित करतांना डॉ. वाघमारे यांनी “वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संघटना नाही, तर शोषित-पीडितांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. पावसाला हरवून आजची उपस्थिती हीच खरी निष्ठा व संघर्षाची तयारी सिद्ध करणारी आहे” असे ठामपणे सांगितले. मोर्च्यादरम्यान वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांची VBA जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या आंदोलनात शिवदास कांबळे, करुणा मुन, सविता तिडके, संतोष राऊत, मंगल तेलंग, नंदिनी ठमके, शारदा मेश्राम यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. तर ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अनंता खाडे, रवी तेलंग, सुरेखा काटकर, शोभा दारुंडे, शितल तेलंग, अभिषा निमसटकर, यशोधरा चंदनखेडे, विनेश मेश्राम, संजय जीवने आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हा मोर्चा गाजवला.

भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तयारी आंदोलनाच्या शिस्तबद्धतेत ठळकपणे जाणवली.

👉 पावसाच्या थेंबांवर विजय मिळवत मारेगावच्या रस्त्यावर उसळलेला वंचितांचा महासागर, संघर्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला आहे.


No comments:

Powered by Blogger.