Latest News

Latest News
Loading...

बेलोरा फाट्याजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळला इसमाचा मृतदेह, खून झाल्याचा व्यक्त होत आहे संशय


प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी घुग्गुस मार्गावरील बेलोरा फाट्याजवळ एका इसमाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. मृतकाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्याने त्याचा अज्ञातांनी खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सोमवार ५ ऑक्टोबराला रात्री उघडकीस आली. विनायक माधव कुळमेथे (५०) रा. सुमठाना ता. भद्रावती असे या मृतकाचे नाव आहे. 

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलोरा फाटा बसस्थानकाजवळ एक इसम मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाजवळ दारूच्या शिश्या व ग्लास आढळून आले. तसेच एक मोठा दगडही मृतदेहाशेजारी आढळून आल्याने या इसमाची हत्या करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. त्यातच त्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याने अज्ञातांनी त्याचा खून केल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालानंतर या इसमाच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार आहे. दारू गुत्थ्यावर बसलेल्या मित्रांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून त्याचा बळी गेला, की कटकारस्थान रचून त्याचा गेम केला, हे लवकरच तपासाअंती समोर येणार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.