प्रशांत चंदनखेडे वणी :-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगाराची वणी ते शिंदोला बस बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून नागरिकांनाही प्रवासात मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. वणी वरून शिंदोला जाणारी बस बंद झाल्याने शाळकरी विद्यार्थी व ग्रामीण जनतेला शहरात जाणे येणे करतांना मोठे अडथळे निर्माण होत असून त्यांचा शहराचा प्रवास कठीण झाला आहे. त्यामुळे वणी ते शिंदोला बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख लुकेश्वर बोबडे यांनी एसटी महामंडळाच्या वणी आगार प्रबंधकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी आगाराची वणी ते शिंदोला बस बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोठे अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. बस अभावी विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे येणे कठीण झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवासात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे वणी ते शिंदोला बससेवा तात्काळ सुरु करणे गरजेचे झाले आहे. या मार्गावर शिंदोला, येनक, खांदला, बोरगाव, येनाडी, चनाखा, परमडोह, कुर्ली, चिखली ही गावे येत येत असून या गावातील जवळपास १०० विद्यार्थी वणी शहरात शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी बसचे पास देखील काढले आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या वणी आगाराकडून या मार्गावरील बससेवाच बंद करण्यात आल्याने विद्यार्थी चांगलेच संकटात सापडले आहेत. बस अभावी त्यांचा शैक्षणिक प्रवास कठीण झाला आहे. विद्यार्थ्यांवर खाजगी वाहने किंवा कुणालाही लिफ्ट मागून शाळेत जाणे येणे करण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळाची बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येणे करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचप्रमाणे गावखेड्यातील नागरिक व शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू व इतरही खरेदीकरिता दररोज शहरात जाणे येणे करावे लागते. तसेच दवाखाना व इतर महत्वाच्या कामांकरिताही त्यांना नेहमी शहरात यावे लागते. परंतु या मार्गावरील बससेवा बंद झाल्याने त्यांनाही प्रवासात मोठे अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. गावकऱ्यांना वेळोवेळी शहरात जाणे येणे करावे लागत असल्याने त्यांना प्रवासात चांगल्याच अडचणी येऊ लागल्याने आगार व्यवस्थापकांनी याकडे लक्ष देऊन वणी शिंदोला बससेवा तात्काळ सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली असून बस सुरु न झाल्यास आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल असा इशाराही देण्यात आला आहे. या मागणीचे आमदार संजय देरकर व उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. यावेळी लुकेश्वर बोबडे यांच्यासह डॉ. जगन जुनगरी, अतिश गौरकार, हेमंत इचोडकर, योगेश थोरक, विकास धगडी, डोमा इचोडकर, दत्ता सोनवणे तथा गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: