Latest News

Latest News
Loading...

जेष्ठ मार्गदर्शक हरपला, सामाजिक, धार्मिक व साहित्य विश्वावर शोककळा, माधवराव सरपटवार यांचं दीर्घ आजारानं निधन

प्रशांत चंदनखेडे वणी :-

लेखक, साहित्यिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधवराव गंगाधर सरपटवार यांचं शुक्रवार दि. १४ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता दीर्घ आजारानं निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ८४ वर्षांचं होतं. शहरातील राम शेवाळकर परिसरातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता वणी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

माधवराव सरपटवार यांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच लेखन व साहित्य क्षेत्रातही आपला एक वेगळा ठसा उमटविला. कवी मनाच्या असलेल्या माधवराव यांनी अनेक पुस्तकांचे लेखन व संपादन केले आहे. नुकतेच त्यांच्या जीवनावर आधारित "माझे जीवन गाणे" हे पुस्तक प्रकाशित झाले. समाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे. जेष्ठ मार्गदर्शक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक नवोदित लेखक व साहित्यिक घडले आहेत. लेखन व साहित्य क्षेत्रात त्यांची न पुसणारी ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येकाने बोध घ्यावा, असं त्यांचं लेखन होतं. जगण्यात बळ व नव्या उमेदीची भरारी मिळावी, ही त्यांच्या लिखाणाची धार होती. त्यांच्या जाण्याने लेखन व साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नवोदितांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारा एक जेष्ठ मार्गदर्शक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. 

माधवराव सरपटवार हे जैताई देवस्थान, नगर वाचनालय, विदर्भ साहित्य संघ, मित्र मंडळ अशा विविध साहित्यिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांच्या जाण्याने या क्षेत्रांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. सुस्वभावी व मनमिळाऊ असलेले माधवराव सरपटवार हे सर्वांचेच आदरस्थान होते. त्यांच्या निधनाने शहरवासी शोकसागरात बुडाले आहेत. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

No comments:

Powered by Blogger.