प्रशांत चंदनखेडे वणी :-
शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एपीआय माधव शिंदे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी संतोष मनवर हे शिरपूर पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार म्हणून रुजू झाले आहेत. एपीआय संतोष मनवर यांनी १४ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजता शिरपूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला. याआधी ये मुकुटबन पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहिले आहेत.
एपीआय माधव शिंदे यांचा शिरपूर पोलिस स्टेशनचा कार्यकाळ संपल्याने त्यांची यवतमाळ जिल्हा पोलिस कार्यालयात पोलिस अधीक्षक वाचक शाखेत बदली झाली आहे. ते वणी पोलिस स्टेशन येथे एपीआय असतांना त्यांच्यावर डीबी पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. नंतर त्यांची शिरपूर पोलिस स्टेशन येथे बदली झाली. गुन्ह्यांची उकल करण्यात ते तरबेज होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा उलगडा केला. गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांना कौशल्य प्राप्त होतं. शिस्तबद्धता आणि शिस्तप्रियता ही त्यांच्या कार्याची ओळख होती. त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांना नेहमी सन्मानाची वागणूक दिली. तपास चातुर्य आणि दूरवर पसरलेलं खबरी नेटवर्क यामुळे त्यांनी अनेक क्लिस्ट गुन्हेही उघडकीस आणले. गुन्हेगार कुठल्याही बिळात लपला असला तरी ते त्याला शोधून काढायचे. वणी विभागात यशस्वी कारकीर्द त्यांनी पार पाडली. आता त्यांची जिल्हा पोलिस कार्यालयात पोलिस अधीक्षक वाचक शाखा येथे बदली झाली आहे.
एपीआय माधव शिंदे यांची बदली झाल्यानंतर संतोष मनवर यांनी शिरपूर पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारला. त्यांची शिरपूर पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार म्हणून नियुक्ती झाली आहे. संतोष मनवर हे रुबाबदार व भारदार पोलिस अधिकारी असून त्यांची कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळख आहे. आपल्या कार्यात ते नेहमी तत्पर असतात. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा त्यांचा सर्वोतपरी प्रयत्न असतो. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. कामात हयगय ते खपवून घेत नाही. वाचाळवीरांशी संबंध वाढविणे त्यांना पसंद नाही. कामात तत्परता बाळगणे ते पसंद करतात. मुकुटबन पोलिस स्टेशनला असतांना गुन्हेगारी वर्तुळाचा थरकाप उडविणारे ते एक दबंग ठाणेदार म्हणून नावारूपास आले होते. त्यांची शिरपूर पोलिस स्टेशनला नियुक्ती होताच गुन्हेगारी वर्तुळाने चांगलीच धास्ती घेतली असून गुन्हेगारांमध्ये त्यांच्या धाडसी कारवाईच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीने शिरपूर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व समाधान दिसून येत आहे.

No comments: