Latest News

Latest News
Loading...

भीषण अपघात : आयशर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण तरुणी जागीच ठार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मालवाहू आयशर वाहनाने मोपेड दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दि. १५ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मारेगाव जवळील तुळशीराम बियरबार जवळ घडली. धडक एवढी भीषण होती की, मोपेड दुचाकी ट्रकच्या चाकाखाली येऊन काही मीटरपर्यंत घासत गेली. यात दोन्ही दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा करून अंत झाला. हे तरुण तरुणी दुचाकीने वणी कडून मारेगावकडे जात असतांना हा भीषण अपघात घडला.

मारेगाव तालुक्यातील गौराळा येथे राहणारा गौरव बापूराव आत्राम (२३) व बोपापूर (कायर) येथील नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (१७) हे तरुण तरुणी मोपेड दुचाकीने (MH २९ BW ७५७५) वणी कडून मारेगावकडे जात असतांना वणी मारेगाव मार्गावरील तुळशीराम बियरबार जवळ समोरून येणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (MH ४० BG ३८०५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मोपेड वाहन काही मीटरपर्यंत अक्षरशः घासत गेले. यात दोनही तरुण तरुणी ट्रकखाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर वाहन चालक हा मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून जमा झाला. नंतर मारेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघतात तरुण तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.