Latest News

Latest News
Loading...

उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप मतदारांच्या घरोघरी, प्रभाग क्रं. ११ व ८ मधील मतदारांच्या घेतल्या भेटीगाठी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापासून तर २९ नगरसेवकांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. नगर पालिका निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याकरिता भाजपने व्युव्हरचना आखली आहे. आखलेल्या रणनीतीनुसार उमेदवारांच्या प्रचाराचं धोरण ठरविण्यात आल्याने नगर पालिका निवडणुकीकडे भाजपची नियोजनबद्ध वाटचाल सुरु झाल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून त्यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या घरभेटी घेत आहेत. प्रभाग क्रमांक ११ व ८ मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी राबविण्यात आलेल्या प्रचार मोहिमेंतर्गत मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी देण्यात आल्या. 
भाजपने नगर पालिका निवडणुकीत बहुतांश नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून त्यांच्या विजयासाठी एक वेगळीच रणनीती आखण्यात आली आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग पिंजून काढले जात आहेत. माजी आमदार बोदकुरवार व ऍड. निलेश चौधरी हे स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. भाजप कडून उमेदवारांच्या प्रचारासाठी व त्यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले जात आहे. उमेदवारांच्या प्रचाराचे प्रभाग निहाय नियोजन आखण्यात आले असून प्रभाग क्रमांक ११ व ८ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी  देण्यात आल्या.
प्रभाग क्रमांक ११ (अ) मधून रेखा विलासराव कोवे व प्रभाग ११ (ब) मधून लवलेश किसनलाल लाल हे भाजप कडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २० नोव्हेंबरला त्यांच्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ डोर टू डोर प्रचार मोहीम राबविण्यात आली. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, सरचिटणीस हितेश अटारा, शहर उपाध्यक्ष मनोज सरमुकदम, सत्यजित ठाकूरवार आदी उपस्थित होते. 
तर प्रभाग क्रमांक ८ (अ) मधून प्रेमिला मनोज चौधरी व प्रभाग ८ (ब) मधून कुणाल संजय सोमशेट्टीवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या आणि विद्या खेमराज आत्राम यांच्या प्रचारार्थ २१ नोव्हेंबरला भाजपने मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार मोहीम राबविली. या उमेदवारांच्या प्रचारासाठीही भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष सत्यजित ठाकूरवार, शुभम छाजेड आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम यांना विजयी रथावर आणण्याकरिता भाजप कडून वेगवेगळे डावपेच आखले जात आहे. विकासाच्या अजेंड्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचार सुरु असून शहराच्या विकासाची घौडदौड पुढे सुरु ठेवण्याकरिता भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन भाजप कडून केले जात आहे. 

No comments:

Powered by Blogger.