प्रशांत चंदनखेडे वणी :-
वणी तालुक्यातील रांगणा येथील विवाहित युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार २२ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल आनंदराव दुर्गे (३५) असे या विष पियुन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
तालुक्यात आत्महत्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून एका मागून एक आत्महत्या होऊ लागल्याने तालुका हादरला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रांगणा येथे परिवारासह राहत असलेल्या राहुल दुर्गे याने राहत्या घरीच विष प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments: