Latest News

Latest News
Loading...

(Breaking News) भीषण अपघात : भरधाव ट्रकने मोपेड दुचाकीला उडविले, दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-

सुसाट ट्रकने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार 19 नोव्हेंबरला दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरातील गुल पेट्रोलपंप जवळ घडली. नाजनीन फातिमा शेख मकसूद शेख वय अंदाजे 40 वर्षे रा. ख्वाजा नगर लालपुलिया असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

चिखलगाव ग्रामपंचात हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरातील गुल पेट्रोलपंप येथे दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर ही महिला पेट्रोलपंप बाहेर आली. ती दुचाकीने मुख्य मार्गावर वळण घेत असतानाच वणीकडे भरधाव येणाऱ्या 18 चाकी ट्रकने दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात ही महिला जागीच ठार झाली. हा ट्रक सीसीआर ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याचे सांगण्यात येते. डोलोमाईटची वाहतूक करणाऱ्या या ट्रकने गुल पेट्रोलपंपवर पेट्रोल भरून पेट्रोलपंपबाहेर पडणाऱ्या दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समोर पेट्रोलपंप असल्याची माहिती असतांना देखील ट्रक चालकाने भरधाव व निष्काळजीपणे ट्रक चालवून एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. ट्रक चालकांच्या सुसाट व लापरवाहीने ट्रक चालविण्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या असून अपघातात निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. लालपुलिया परिसरात रस्त्यावरही तासंतास ट्रक उभे असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना समोरून येणारे वाहन दिसत नाही, आणि अपघात घडतात. अपघातात मृत्युमुखी पडलेली नाजनीन ही मकसूद शेख यांची पत्नी असून मकसूद शेख हे लालपुलिया परिसरात सर्वांनाच परिचित आहेत. त्यांचा ऑईल विक्रीचा व्यवसाय असून अलीकडेच त्यांनी हॉटेल देखील सुरू केले आहे. पत्नीच्या अपघाती मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा पहाड कोसळला आहे. नाजनीन यांच्या पश्चात पती दोन मुली व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकवर कार्यवाही करीत ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.