संत शिरोमणी श्री नामदेव महाराज चौकाचे अनावरण! भक्ती, संस्कृती आणि एकतेचा सुगंध पसरवणारा सोहळा वणी शहरात संपन्न
संत परंपरेचा गौरव वाढविणारा आणि समाजात एकतेचा संदेश देणारा एक भावपूर्ण सोहळा वणी शहरात नुकताच संपन्न झाला.
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त वणी तालुका शिंपी समाज संस्था यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १२, नारायण निवासजवळील चौकाला “संत शिरोमणी श्री नामदेव महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले.
या चौकाच्या फलकाचे अनावरण वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल आक्केवार (अध्यक्ष, वणी तालुका शिंपी समाज संस्था) हे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सचिन गाडे (मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी), जयंत सोनटक्के (उपमुख्याधिकारी, नगरपरिषद वणी), मोरेश्वर उज्ज्वलकर (अध्यक्ष, वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणी) पांडुरंग भंडारवार, कुंतलेश्वर तुरविले, गजानन कासावार, अरुणराव पावडे, प्रीतीताई बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दिपक दिकुंडवार (सचिव, शिंपी समाज संस्था) यांनी केले, तर आभार प्रदर्शन राकेश दिकुंडवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजातील कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
यामध्ये अध्यक्ष अनिल आक्केवार, उपाध्यक्ष संतोष कर्णेवार, कोषाध्यक्ष कैलास कर्णेवार, तसेच सुनील आक्केवार, स्वप्निल कर्णेवार, किरण दिकुंडवार, उमेश वऱ्हाडे, विजय गटलेवार, आशिष रामगिरवार, प्रज्योत रामगिरवार, प्रसाद राजूर्लेवार, अनिकेत आक्केवार, ओम कर्णेवार, पदमाकर मंथनवार, अरुण वझलवार, देविदास गटलेवार, संकेत आक्केवार, नितीन रामगिरवार, वसंत नांदगीरवार, ओम आक्केवार यांचा समावेश होता.
त्याच्याप्रमाणे महिला कार्यकारिणीत अध्यक्षा प्रतिभाताई मंथनवार, सचिव पूजा रामगिरवार, तसेच कल्पना दिकुंडवार, प्रणिता गटलेवार, सुषमा आक्केवार, प्रियंका कर्णेवार, संध्या राजूर्लेवार, वंदना आक्केवार, मंगला नांदगीरवार, शरयू पोलपेल्लिंवार, वर्षा वऱ्हाडे यांनी देखील या कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका निभावली.
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या नावाने चौकाचे नामकरण व फलकाचे अनावरण करण्यात आले. या निर्णयामुळे संत परंपरेच्या गौरवाचा नवा अध्याय लिहिला गेला असून, हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास घडवणारा ठरणार आहे.वणी शहरात “संत शिरोमणी श्री नामदेव महाराज चौक” उभारला जाणेही केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण वणीकरांसाठी अभिमानाची बाब आहे.या उपक्रमातून समाजात भक्ती, संस्कृती आणि एकतेचा भाव अधिक दृढ झाला आहे..
— मोरेश्वर उज्जवलकर (अध्यक्ष, वैष्णव शिंपी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वणी)
“संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नावाने चौकाचे नामकरण हे वणी शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव आहे.या उपक्रमातून भक्ती, संस्कृती आणि समाजभाव यांचा संगम साधला आहे.नामदेव महाराजांचे अभंग गुरुग्रंथ साहिबात मुद्रित आहेत — ही महाराष्ट्राच्या संत परंपरेसाठी अभिमानाची बाब आहे.त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक वणीकराचे कर्तव्य आहे.”
— जयंत सोनटक्के, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद वणी
🌸 भावनात्मक स्पर्श
या नामकरणामुळे वणी शहरात श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
“संत शिरोमणी श्री नामदेव महाराज चौक” हे ठिकाण आता भक्तीचा आणि समाजबंधाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.




No comments: