Latest News

Latest News
Loading...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादरीकरणास सुरुवात


 प्रशांत चंदनखेडे वणी :-

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक तयारीला वेग आला आहे. आमदार संजय देरकर आणि जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर यांनी सर्व शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.

ग्रामीण भागात सत्ताधारी पक्षाविरोधात वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून आगामी निवडणुकीत सक्रिय मोहीम हाती घेण्यात येत आहे. आमदार संजय देरकर यांच्या कार्यशैलीबद्दल मतदारांत समाधानाचे वातावरण असून, पक्षाच्या वणी तालुका कार्यकारिणीकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

शिवसेना (उबाठा) वणी तालुका कार्यकारिणीकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वरोरा रोडवरील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात अर्ज प्रत्यक्ष सादर करावेत. ही प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान, दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहणार आहे.

अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा राजकीय व सामाजिक अनुभव, आतापर्यंतची आंदोलने, जनसंपर्क, आणि स्थानिक कार्याचा तपशील देणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक राजकारणातील सोशल मीडियाच्या प्रभावाचा विचार करून उमेदवाराची फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर), यूट्यूब आदी माध्यमांवरील सक्रियतेची माहिती देखील अनिवार्य करण्यात आली आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे बंधनकारक आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असून, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी तालुका प्रमुख संतोष कुचनकर (मो. ८८८८४५५७७३ / ९८२३९८३१०१), तालुका संपर्कप्रमुख प्रकाश कराड (७७२१०८७९६०), तालुका सचिव राजु इद्दे, तालुका संघटक संभाशिव मते (९१९६३७४१२३) आणि तालुका समन्वयक रविकांत जयस्वाल (९४२००२३१४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.