Latest News

Latest News
Loading...

मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आबई फाट्यावर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा दुर्दैवी मृत्यू


प्रशांत चंदनखेडे वणी :-

मावळत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका वृद्धाचा अपघात होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वणी शिंदोला मार्गावरील आबई फाट्याजवळ सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास घडली. नारायण शंकर टेकाम वय अंदाजे ६० वर्षे रा. कुर्ली असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. 

तालुक्यातील कुर्ली येथे वास्तव्यास असलेल्या नारायण टेकाम यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. ३१ डिसेंबरला शेतातून घरी परतणाऱ्या वृद्धाचा आबई फाट्यावर अपघात झाला. पायदळ घराकडे जात असलेल्या वृद्धाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. 

आबई फाट्यावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मालवाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाहन चालक भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालवीत असल्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगाला आवर घालणे गरजेचे झाले असून वाहतुक नियंत्रित करण्याकरिता आबई फाट्यावर आवश्यक त्या उपायोजना करणे निगडीचे झाले आहे. वृद्धाला धडक देणाऱ्या वाहनाचा अद्याप शोध लागला नसून पोलिस अज्ञात वाहनाचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

No comments:

Powered by Blogger.