Latest News

Latest News
Loading...

सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंगचा नेत्रदीपक निकाल, विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली


प्रशांत चंदनखेडे वणी :-

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र २०२५–२६ च्या सेमिस्टर पद्धतीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

महाविद्यालयातील सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे.

प्रथम वर्षामध्ये ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे १३ विद्यार्थी, ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे १४९ विद्यार्थी, तर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तब्बल ३१४ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग प्रथम वर्षात आना मॅरियम (८९.४१%), झाशेन परवेझ सय्यद (८९.१८%), हिमांशी अशोक अहिरकर व कर्तव्य विलास पेचे (८७.५३%), निकिता यादव व प्रियंका त्रिलेश गुम्पालवार (८७.२९%), सानिया गंगाधर आसुटकर (८६.४४%), आर्यन मधुकर कोठके व सलोनी आरेकर (८५.४१%) यांच्यासह सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंगच्या इतर २६ विद्यार्थ्यांनीही ८२ ते ८४ टक्क्यांदरम्यान गुण मिळवत संस्थेच्या सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःशीच स्पर्धा ठेवून सातत्य, जिद्द आणि स्वप्नपूर्तीची इच्छाशक्ती कायम ठेवल्यास यश निश्चित मिळते, हे या निकालातून अधोरेखित झाले आहे. यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता सातत्याने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते, असा संदेश या निकालातून मिळतो.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख व उपप्राचार्य अनिल खुजे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Powered by Blogger.