Latest News

Latest News
Loading...

प्राचार्य महिलेची गळफास घेऊन आत्महत्या


प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील महादेव नगरी येथे राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. युगंधरा स्वप्नील खरवडे (वय ३५) असे या आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास शिक्षिकेचे पती घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा आतून बंद दिसला. खूप वेळपर्यंत दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेवटी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना युगंधरा या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. ही बातमी नंतर परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिमसंस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

युगंधरा खरवडे या वणी येथील राजकुवर महिला महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती, ११ वर्षांचा मुलगा व तीन महिन्यांचे चिमुकले बाळ असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आत्महत्या करण्याने मुलांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे. उच्च शिक्षित व शिक्षिका असलेल्या महिलेने नैराश्येतून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. 

शिक्षिकेच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.