Latest News

Latest News
Loading...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही न जुमानता नांदेपेरा बायपासवर जड वाहतूक सुरूच, मनसेचा ८ दिवसांचा अल्टिमेटम; रस्ता रोकोचा इशारा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेपेरा बायपास ते खैरी-वडकी मार्गावर जड वाहतुकीस बंदी घातलेली असतानाही या मार्गावरून बेकायदेशीर अवजड वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शाळकरी मुले, दुचाकीस्वार व हलक्या वाहनांना या मार्गाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे.

या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, वाहतूक नियंत्रक शाखेला निवेदन देत जड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई न केल्यास येत्या ८ दिवसांत ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे. आंदोलनातून उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदन देतांना मनसेचे आकाश काकडे, लकी सोमकुवर, योगेंद्र तूरणकर, प्रवीण कळसकर, धीरज पेचे, रणजीत बोंडे, धीरज बगवा, कैलास काकडे, वैभव पुराणकर, सौरव राजूरकर, अंकित काकडे, रुपेश जोगी, कवडू काकडे, चेतन सुर, सुरज काकडे, दिनेश झीले, अतुल तेलतुंबडे, आकाश काकडे यांच्यासह कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.