प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा पालकर बूट हाऊस आणि पालकर फटाका एजन्सीचे संचालक रवींद्र पालकर यांचे वडील, सेवानिवृत्त महसूल कर्मचारी लिलाधरराव रघुनाथजी पालकर यांचे आज मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.
अत्यंत सुस्वभावी, मनमिळाऊ आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून लिलाधरराव पालकर यांची शहरात ओळख होती. महसूल विभागातील प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा रवींद्र पालकर, कुटुंबीय व आप्तस्वकीय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेक मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments: