प्रशांत चंदनखेडे वणी :-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सिद्धार्थ वसतिगृह, वणी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पुरुषोत्तम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ नगराळे व प्रा. बाळासाहेब राजूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नगराळे यांनी केले.
यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विठ्ठल महादेव पारखी याने प्रथम क्रमांक, यशिद राजू नेमाम याने द्वितीय क्रमांक तर साहील प्रविण आसुटकर याने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर प्रमुख पाहुणे प्रा. बाळासाहेब राजूरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेत स्त्री शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. पुरुषोत्तम पाटील म्हणाले की, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांमुळे स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर झाला. म्हणूनच प्रत्येक घरात सावित्रीबाईंचा विचार रुजणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी काशा खुटेमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक मंगल लेलंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसतिगृह सेवक कैलाश वडस्कर तथा वसतिगृहातील विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

No comments: