Latest News

Latest News
Loading...

"क्राईम ब्लास्ट' वर्दळीच्या रस्त्यावरील बंद दुकानाच्या व्हरांड्यात एका तरुणाचा निर्घृण खून


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आपसी वादातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवार १८ फेब्रुवारीला रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास शहरातील संजय ऑटो मोबाईल येथे घडली. मल्लेश प्रेमकोंडावार वय अंदाजे २३ ते २४ वर्षे असे या खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे सांगितले जाते. 

शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती प्रचंड वाढली असून शुल्लक कारणावरून खून करण्यापर्यंत गुंडांच्या हिंमती वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधीही वणी पोलीस स्टेशन हद्दीत एका पाठोपाठ खुनाच्या घटना घडल्या आहेत. यावरून पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातून जाणाऱ्या वणी चिखलगाव या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या संजय ऑटोमोबाईल येथे आपसी वादातून एका तरुणाचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत ही खुनाची घटना घडल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली असून या घटनेमुळे शहर हादरले आहे. 

शहरातील दामले फैल येथे राहणाऱ्या मल्लेश प्रेमकोंडावार याचा आपसी वादातून भुऱ्या (वय अंदाजे ३० वर्षे रा. पळसोनी ) नामक युवकाने लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मल्लेश आणि भुऱ्या हे दोघेही टपोरी असल्याचे सांगण्यात येते. कुणाचाही ९२ करण्यात हे दोघेही पटाईत होते, असेही बोलले जाते. आज या दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून जोरदार वाद झाल्याचे सांगण्यात येते. या वादातूनच भूऱ्याने मल्लेशचा गेम केल्याची चर्चा शहरात सुरु आहे. या घटनेमुळे शांतताप्रिय शहर परत एकदा गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आले आहे. परवाच पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीतही वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्याच्या पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु पोलिसांचा गुन्हेगारांना जराही धाक न उरल्याने ते प्रचंड निर्ढावले असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आज भरवस्तीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वणी शहरात मागील काही दिवसांत गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा जराही भय उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच एसडीपीओ सुरेश दळवे आणि ठाणेदार गोपाल उंबरकर हे स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.