Latest News

Latest News
Loading...

शिंदोला प्रीमियर लीग आमदार चषक स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, संजय देरकर यांच्या नेतृत्वात ग्रामीण खेळाडूंना मोठे व्यासपीठ


प्रशांत चंदनखेडे वणी :-

ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिंदोला येथे प्रथमच “शिंदोला प्रीमियर लीग – आमदार चषक” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नवयुवक क्रिकेट क्लब, शिंदोला यांच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेत पूर्णश्री इलेव्हन, जय भवानी टायगर, वणी रॉयल्स, पंचमुखी डॉमिनेटर्स, शेतकरी वॉरियर्स, ठाकरे वॉरियर्स, मोरया इलेव्हन आणि शिव शंभू इलेव्हन अशा एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे ५७ गावांतील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेत ग्रामीण क्रिकेटमधील उत्साह अधोरेखित केला.
अंतिम सामन्यात लुकेश्वर बोबडे व कवडू धगडिया यांच्या नेतृत्वाखालील पूर्णश्री इलेव्हन संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. रामदास कोल्हे यांच्या पंचमुखी डॉमिनेटर्स संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. आयुष ठाकरे यांच्या ठाकरे वॉरियर्स संघाने तृतीय, तर अमोल हेपट व भास्कर दानव यांच्या जय भवानी टायगर संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

बक्षिस वितरण सोहळा लक्ष्मण बोबडे, लुकेश्वर बोबडे, विठ्ठल बोंडे, भास्कर दानव, हसनोद्दीन सैय्यद, कवडू धगडी, प्रितम बोबडे, इस्माईल शेख, जीवन डवरे, आयुष ठाकरे, दादाजी ताजने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी ७० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी २० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

खेडेगावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार चषक स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आल्याने परिसरातील युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार संजय देरकर यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्रात नवे दालन खुले केले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुवक क्रिकेट क्लबच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढविला. ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरली.

No comments:

Powered by Blogger.